धरणगाव: येथील काँग्रेसचे समर्पित व निष्ठावंत कार्यकर्ते नंदलाल माणिक महाजन यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धरणगाव काँगेस कमिटीच्या उपशहराध्यक्ष पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, भा.रा.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जळगांव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाने शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनंत परिहार यांनी नंदलाल महाजन यांची सदर नियुक्ती जाहीर केली आहे.[ads id="ads1"]
याप्रसंगी श्री. महाजन यांचे शहर काँग्रेस कमिटीचे जेष्ठ कार्यकर्ते सलीम चौधरी, महेश पवार, दिनेश पाटील, विजय जनकवार आणि शहराध्यक्ष अनंत परिहार यांच्या हस्ते नंदलाल महाजन यांना सदर नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते सुरेश भागवत, सी के पाटील, तालुकाध्यक्ष व्ही डी पाटील, गंगाराम साळुंखे, गणेश सोनवणे, सुनील बडगुजर, दिनेश गुजर, रामचंद्र माळी, गौरव चौहाण, योगेश येवले, भूषण भागवत, जयेश पारधी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.[ads id="ads2"]
नंदलाल महाजन हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी विद्यार्थीदशेत एन एस यु आय, राष्ट्रीय सेवा दल, संघटनेत कार्य केले आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व विविध विषयांवर त्यांनी आवाज उठवला आहे. जन सामान्यांचा समस्यांवर विविध आंदोलन करुन पक्ष संघटनेचे हित जपले आहे.
✓ हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे सांडपाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
✓ हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना
तसेच कोविड-१९ काळात रुग्णांना अनेक प्रकारचे मदतसाह्य केले आहे. आतापावेतो पक्षासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त उपशहराध्यक्ष श्री. महाजन यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व काँग्रेस पक्षातील मान्यवरांसोबत सहकार्याने मी कार्यतत्पर राहील असा विश्वास श्री. महाजन यांनी व्यक्त केला.


