यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - अट्रावल ता. यावल येथे दि.१ एप्रिल रोजी झालेल्या दोन गटातील दंगल प्रकरणी दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याबद्दल आजरोजी बौद्ध समाज्याच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर श्री. डॉ. कुणाल सोनवणे व यावल पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.राकेश मानगावकर यांची यावल येथे भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.[ads id="ads1"]
सदर निवेदनात म्हटले आहे की जाणीवपूर्वक बौद्ध समाज्याच्या सुशिक्षित तरुणांना खोट्या गुन्ह्यात समाज कंटकांकडून अडकविण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने सदर घटनेची योग्य चौकशी करून निष्पाप लोकांविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यावर पोलीस प्रशासनाने शिष्टमंडळास आश्वासन दिले की कोणत्याही निष्पाप लोकांवर कारवाई करण्यात येणार नाही योग्य चौकशी करून ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच जर कोणी सुशिक्षित तरुणांना अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याचीही चौकशी करून वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.[ads id="ads2"]
शिष्टमंडळात कामगार नेते दिलिप कांबळे, प्रदेश सचिव अनुसूचित जाती विभाग राजू सवर्णे, माजी नगरसेवक रावेर ऍड. योगेश गजरे, वंचित बहुजन आघाडी रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे, माजी नगरसेविका सावदा नंदा लोखंडे, अनुसूचित जाती महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा मोरे, सामाजिक समता मंच रावेर कार्याध्यक्ष उमेश गाढे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू वाघ, महेश लोखंडे, जलसाकार मनोहर तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अवसरमल,राजेंद्र पानपाटील, सुनिल शिरतुरे, विजय भालेराव,लक्ष्मी मेढे, गोपाल तायडे, अरूण गजरे, सुनिल गजरे,नंदू भास्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति म. अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई, जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव व उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना देखिल पाठविण्यात आल्या आहेत.
✓ हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे सांडपाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
✓ हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना


