विवरे बु ता.रावेर (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील विविध गोष्टींमुळे बहु चर्चेत असणारी विवरे बु. ग्रामपंचायत .वार्ड क्रमांक पाच या ठिकाणी गट नंबर 325 (अ ) ( ब ) बेघर प्लॉट रावेर रोड टॉवर जवळ असणारे लोक वस्तीत ग्रामपंचायतीने गटारीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु गटारीतून वाहणारे सांडपाणी व घाणीचा विल्हेवाट मात्र लावलेला नाही.[ads id="ads1"]
घराघरातून निघणारा सांडपाणी घाण कचरा त्याच ठिकाणी पडून व त्या ठिकाणी अडकून असल्याने स्थानिक रहिवाशांना व आसपासच्या लोकांना दुर्गंध व प्रदूषणामुळे रोगराईचा सामना करावा लागत आहे वस्तीतुन निघणारा घाण कचरा व प्रदूषित सांडपाणी घरातून निघते बाहेर गटारीत पडते मात्र त्या ठिकाणी अडकून राहते ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व या वार्डातुन निवडून आलेले प्रतिनिधी कोणत्याही प्रकारची कामे करत नाही.[ads id="ads2"]
ग्राम पंचायतीने या ठिकाणी येणे परमिशन देण्यात आली प्लॉटी पाडण्यात आल्या व प्लॉटही विकल्या गेल्या या ठिकाणी घर वस्ती तयार झाली त्यातून घरपट्टी पानिपट्टी दिवाबत्ती व इतर कर वसूल करण्यात येतो पण मात्र त्या ठिकाणच्या वस्तीतून निघणारा निचरा प्रदुषीत सांडपाणी बाहेर कुठे काढण्याची व्यवस्था करण्यात आली नाही व केली सुद्धा नाही तसेच ,या ठिकाणी असे दिसून येते की ग्रामपंचायती ने या वस्तीतील लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ताही उपलब्ध करून दिलेला नाही
हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना
हेही वाचा :- ऐकावे ते नवलचं ना ; जळगाव जि.प. माजी अध्यक्ष पतीच्या उमेदवारी अर्जाची चोरी ; रावेर कृ.ऊ.बा.मधील प्रकार
निवडणुकीच्या दरम्यान निवडणूकीत निवडुन येण्यासाठी या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मोठमोठे आश्वासने देत असतात मात्र याच वार्डातून निवडून येणारे प्रतिनिधी निवडून आल्यानंतर या लोकांना विसरून जातात असे दिसून येत आहे आश्वासने दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे या लोकांची समस्या सोडवली गेलेले नाही म्हणून गट नंबर 325 अ ) व ब येथील सांडपाण्याचा निचरा घानकचरा व प्रदूषणाला आळा बसावा म्हणून ग्रामपंचायतीने स्थानिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा व लोकांच्या आरोग्यासाठी हाणी होणाऱ्या प्रदूषणामुळे सांडपाण्याचा विल्हेवाट लावावा असे स्थानिक ग्रामस्थ रहिवाशी नागरिकांचे म्हणणे आहे.


