यावल (सुरेश पाटील) शहरापासून काही अंतरावर असलेल्या जुना कोरपावली रस्त्याने यावल शिवार गट नंबर 1958 एक मधील 15 दिवसांनी काटले जातील असे केळीचे घड अज्ञात इसमाने काटून जवळपास वीस हजार रुपयाचे नुकसान केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा घबराट उडाली आहे.[ads id="ads1"]
यावल येथील अर्जुन नारायण बारी रा.बालाजी सिटी बीएसएनएल कार्यालयाजवळ यावल यांच्या शेतातील 2 एप्रिल 23 रोजी संध्याकाळच्या सुमारास अज्ञात इसमानी 30 ते 40 केळीचे घड कापून अंदाजे वीस हजार रुपयाचे नुकसान केले.
हेही वाचा : सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना
अर्जुन नारायण बारी हे त्यांचे मित्र दिलीप बारी यांच्यासोबत शेतात गेले असता त्यांच्या शेतामधील 30 ते 40 काटनवर आलेले केळीचे घड काटून फेकलेले दिसले,म्हणून त्यांनी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी नुकसानी बाबत गुन्हा दाखल केला आहे.[ads id="ads2"]
गेल्या काही दिवसापूर्वी अट्रावल रस्त्यावर एका शेतकऱ्याची 25 लाखाची केळी कापून नुकसान केले होते आज पावतो या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध लागलेला नाही हे प्रकरण शांत होते नाही तो तोपर्यंत दुसऱ्या नवीन परिसरात अर्जुन बारी यांच्या शेतात पुन्हा त्याच धर्तीवर केळीचे घड कापून फेकले आहे यावल पोलिसांनी अशा गुन्हेगारांच्या पर्दाफास करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे केळीचे नुकसान करणाऱ्यांचा शोध लागत नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.


