हि घटना गंभीर असल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा सदर घटनेची गंभीर दखल घेत उमेदवारी अर्ज स्वीकारत असलेल्या ठिकाणाहून गर्दी बाहेर काढून प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली.मात्र झालेली चोरी हा विषय संपुर्ण तालुकाभर चर्चेचा ठरला.
✓ हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथे सांडपाणी व घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त
✓ हेही वाचा :- सरपंच पद रद्द होण्याचा अर्ज केल्याच्या कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला : जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील यांचे पती भा.ज.पा. जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास रावेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दाखल झाले,यावेळी त्यांच्या सोबत भा.ज.पा. जळगाव जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,पद्माकर महाजन,भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुकर व आदि पदाधिकारी उपस्थित होते. [ads id="ads2"]
निवडणूक अधिकारी यांच्या टेबलावर ठेवलेला अर्ज कोणीतरी अचानकपणे कोणीतरी गायब केल्याने, अर्ज शोधण्याची गडबड सुरु झाली. मात्र अर्ज मिळून येत नाही, हे प्रल्हाद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात येवू लागण्यावर वेळ अर्ज भरण्याची वेळ संपण्याआधी नवीन अर्ज भरून त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र अर्ज चोरीची घटना राजकीय चर्चा रावेर शहरासह संपूर्ण तालुकाभर रंगली आहे. भाजपच्या नेत्यांची अशी परिस्थिती होते, तर सर्वसामान्य उमेदवारांची तर कशी गत होईल हे यावरून दिसून येते.


