दैनंदिनी नुसार दररोज सकाळी दुध , अंडी व फळे देणे आवश्यक असतांना दुध अंत्यत कमी, फळे निकुष्ठ दर्जाचे दिले जातात . जेवणामध्ये दररोज डेमंसे , भोपळा दिला जातो . आठवडयातुन दोन वेळा मासाहार देण्यात येत नाही, याबाबत विद्यार्थीने आवाज उठविला तर त्यांना धमकी दिली जाते .
त्यांच्या वर्तणुकीबाबत कॉलेजला अहवाल मागविण्यात येतो . यामुळे विद्यार्थी वस्तीगृहात दहशतीत वावरत आहे . गृहपाल हे महिना किंवा दोन महिन्यांनी रावेर येथे येतात.[ads id="ads2"]
या संदर्भात वस्तीगृह विद्यार्थी समाज कल्याण उपायुक्त योगेश पाटील यांना जळगांव येथे तक्रारी घेवुन गेले तरी पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे व भोजन पुरवठादाराच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले त्यामुळे त्यांनी दोन दिवस जेवणावर बहिस्कार टाकला .
हेही वाचा :- रावेर,निंभोरासह,सावदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले
हेही वाचा : -चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात
हेही वाचा :-वीज कोसळून ९ शेळ्या ठार ; गुराखी थोडक्यात बचावला ; जळगाव जिल्ह्यातील घटना
त्यामुळे समाजकल्याण प्रशासन जागे झाले, घडलेल्या प्रकारामुळे गृहपाल यांनी प्रत्यक्ष येवुन विद्यार्थ्यांची समजुत काढली परंतु दोन दिवसांपासुन उपाशी असलेल्या विद्यार्थ्यां कोणाचे ही ऐकन्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांचे म्हणणे होते की , उपआयुक्त योगेश पाटील यांनी आमच्या समस्या ऐकून घ्याव्या.
शेवटी उपायुक्त योगेश पाटील यांनी मोबाईल वरून संभाषण केले . व त्यांनी भोजन पुरवठादारांबाबत त्वरीत निर्णय घेण्यात येईल असे समाधानकारक आश्वासन दिल्याने विद्यार्थीनी जेवणावर टाकलेला बहिस्कार मागे घेतला. यावेळी सामाजिक समता मंचचे अध्यक्ष राजु सवर्णे , कार्याध्यक्ष उमेश गाढे , सामाजिक कार्यकर्ते पिंटू वाघ यांचे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


