मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड(Ramgad Taluka Muktainagar Dist Jalgaon) येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावा लगत गेला होता. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. [ads id="ads2"]
या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारासाठी मुक्ताईनगर (Muktainagar) येथे दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरपंच दत्ता पाटील यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली.
हेही वाचा :- रावेर,निंभोरासह,सावदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले
हेही वाचा : -चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात
तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा उचंदे (Uchande) येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.