रावेर/यावल (फिरोज तडवी)
रावेर तालुक्यातून प्रारंभ झालेल्या तडवी भिल्ल समाज जोडो यात्रेला आज् तब्बल 11 दिवस होऊन 44 गावां चा पाई प्रवास होऊन 385 की मी अंतर कापून यावल तालुक्यातील बोरखेडा गावात प्रारंभ झाला , पद यात्रेस प् सहभागी असणाऱ्य चे गावकऱ्यांच्या वतिने स्वागत करण्यात आले.[ads id="ads1"]
पद यात्रेचे जनक मुनाफ जुम्मा तडवी कोरपावली , फिरोज तडवी लोहारा , आयाझ तडवी मोहोराळा , हे सहकारी असून गवा गावात आदिवासी तडवी भिल्ल समाज जनजागृती करण्याचे कार्य करीत असून समाज एकत्रित करून त्यांना न्याय व त्यांच्या हक्वांचे प्रबोधन करण्याचे काम या पद यात्रेच्या माध्यमातून करण्यत येतं आहे, बोरखेडा गावात पद यात्रेचे गवकऱ्यनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तायडे सर यांनी केले.[ads id="ads2"]
त्या प्रसंगी आदिवासी तडवी भिल्ल समाजावर आधारित चित्रपट " मेहन चा मिठा फय " या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित तडवी, आदिवासी तरूण तडफदार कवी महेमूद तडवी उथखेडा, कवियेत्री शहानूर तडवी , अल्ताफ तडवी कोरपावली , नशीबा मॅडम बोरखेडा,उपस्थित कवींनी तडवी भाषेतील कविता सादर केल्या,,जनता का खासदार चे प्रबंध संपादक मासूम तडवी, जहांगीर तडवी यांच्या सह बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला, कार्यक्रमास महिलांची संख्या अधिक असल्याने दिसुन आले.
हेही वाचा :- रावेर,निंभोरासह,सावदा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले
हेही वाचा : -चार हजाराची लाच भोवली ; रावेर तालुक्यातील "या" गावातील कोतवालासह,तलाठी एसीबीच्या सापळ्यात
हेही वाचा :-वीज कोसळून ९ शेळ्या ठार ; गुराखी थोडक्यात बचावला ; जळगाव जिल्ह्यातील घटना