सरपंच व शिपाई यांनी लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल ; जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

ग्रामपंचायतची बखळ जागा स्वतःचे नावे करून त्यावर शासनाचे घरकुल योजनेअंतर्गत घर बांधायचे असल्याने त्यासाठी तक्रारदार हे सरपंच यांना भेटले तेव्हा सरपंच यांनी ग्रामपंचायत शिपाई यांच्यामार्फत ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंच व शिपाई याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

(ads)

याबाबत सविस्तर माहिती जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी फिर्याद दिली की,  घटनेतील मूळ तक्रारदार हे मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावातील रहिवासी आहेत, ते परिवारासह काकोडा गावात राहतात तक्रारदार यांना काकोडा गावात ग्रामपंचायतची बखळ जागा स्वतःचे नावे करून त्यावर शासनाचे घरकुल योजनेअंतर्गत घर बांधायचे असल्याने त्यासाठी ते सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना भेटले.

हेही वाचा : रि - टेंडर काढले पण, शुद्धिपत्रक हे जावक क्रमांक,व तारखेवीणाच : रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्रामसेवकाचा प्रताप : ग्रामसेवकावर कारवाईची मागणी


तेव्हा सरपंच कांबळे यांनी तक्रारदारांस दि.३० ऑक्टोबर २०२४ काकोडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सहीचा नमुना नंबर ८ चा उतारा आणून दिला.त्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे सरपंच कांबळे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यामुळे तसेच लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सरपंच कांबळे यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्याकडे लाच मागणीबाबत तक्रार केली होती.

(ads)

लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिल्याने तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच कांबळे यांनी तक्रारदार यांच्या नावे काकोडा ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क्रमांक ८  चा उतारा तयार करून आणून दिला त्या मोबदल्यात ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांनी पंच व साक्षीदार यांचे समक्ष ३ हजार रुपये लाचेची मागणी केली सदर लाच मागणी सरपंच कांबळे यांनी प्रोत्साहन दिल्याची खात्री झाली म्हणून त्यांचे विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३९९/२०२५ दाखल करण्यात आला.

(ads)

सापळ्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभाग परिक्षेत्र पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे, यांच्यासह पथकात सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील,पो कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी केली पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!