रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे आमदार मा. अमोल दादा जावळे यांच्या निधीतून सुमारे १० लाख रुपये खर्चाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ धनके हे होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. गोमती ताई बारेला जिल्हा चिटणीस विजय भाऊ महाजन, दुर्गादास भाऊ पाटील, हेमराज लासुरे, रावेर उत्तर मंडळाचे अध्यक्ष रवी भाऊ पाटील यांची उपस्थिती होती.
(ads)
आमदार अमोल दादा जावळे हे केरळ येथील निवडणूक कामानिमित्त उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. त्यांनी या कामाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना होणाऱ्या सुविधांचा उल्लेख करत विकासकामे अधिक वेगाने राबवण्याचा विश्वास व्यक्त केला.
(ads)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावेर दक्षिण मंडळाचे अध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख यांनी केले. त्यांनी रस्त्याच्या कामाचे महत्त्व व स्थानिक विकासासाठी अमोल दादा जावळे यांनी या अगोदरही गावांमध्ये सभागृहासाठी 20 लक्ष रुपये तसेच आनंद बाबा मठ सभागृहासाठी सात लाख रुपये इतका निधी मागील तीन महिन्यात दिलेला आहे
(ads)
यावेळी संजय महाजन, ज्येष्ठ दामू अण्णा विचवे, रमाकांत पाटील,राजाराम चौधरी,ज्ञानेश्वर विचवे, अतुल पाटील,राजेंद्र चौधरी, कृष्णाजी पाटील, ज्ञानदेव वानखेडे, सोपान चौधरी, लक्ष्मण पाटील, रमेश विचवे,कृष्णा काटकर, नाना साळुंखे, भागवत येवले, प्रदीप पाटील, दिपक गुप्ता, घनश्याम हरणकार, ज्ञानेश्वर पाटील,संदीप पाटील, प्रा. राजेंद्र पाटील, भागवत महाजन, सीताराम विचवे,
हेही वाचा : लहान बालिकेला जंगली प्राण्याने केले ठार : जळगाव जिल्ह्यातली घटना, वन विभागाच्या विरोधात नागरिकांचा संताप
सुभाष शंकर महाजन,बाबुराव पाटील, सौ. पूनम ताई बोंडे भीमराव विचवे, अरुण विचवे, कुंदन चौधरी वसंत पाटील, विशाल पाटील,गुड्ड हंसकर, समाधान चौधरी, अशोक चौधरी, अक्षय चौधरी, रमेश गायकवाड,निखिल गायकवाड, भरत महाजन,रघु गायकवाड संतोष लोखंडे, पिंटू लोखंडे,अजय राणे,यांचीही उपस्थिती लाभली.तसेच गावातील व परिसरातील युवा, ग्रामस्थ, महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होते
(ads)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत विचवे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रा राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले या भूमिपूजनामुळे विवरे खुर्द परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या रस्त्याची सुविधा मिळणार असून स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. व आमदार अमोल दादा जावळे यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त केले



