*📘वाचाल तर वाचाल - मुख्याध्यापक जे.एस.पवार सर*
*📗पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते - ग्रंथपाल गोपाल महाजन.*
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगाव - सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत माळी सर यांनी केले. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार सर होते. मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती - मिसाईल मॅन - डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेचे ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्त्व सांगितले व पुस्तक वाचनाने मस्तक सशक्त होते असे प्रतिपादन केले. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मुलांनी जास्तीत जास्त ग्रंथालयातून अवांतर पुस्तकांचे वाचन करावे हीच डॉ.कलाम साहेबांना खरी आदरांजली ठरेल.[ads id="ads2"]
याप्रसंगी शाळेतील उपशिक्षक एचडी माळी यांनी शाळेच्या ग्रंथालयाला सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे लिखित "सत्यशोधक विधी "हे पुस्तक भेट दिले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, एम.के. कापडणे सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा
हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथपाल गोपाल महाजन व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.